Ads

शिवरायांचे बालपण

   


 शिवरायांच्यावयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली; पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत,  त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत, शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे, जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टी सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली.


गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदाभाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ! ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्लेरचणे हे त्यांचे छंद ! लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवराय त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे.

शिवरायांचे बालपण  शिवरायांचे बालपण Reviewed by D beldar on ऑक्टोबर १३, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.