Ads

महात्मा ज्योतिबा फुले

 


महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्म ११ एप्रील १८२७ मध्ये पुणे येथे झाला. फुले घराण्याचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील ा हे। कटगुण हे होय. त्यांचे मूळ आडनाव गोहे अमे होते. ते जातीने क्षत्रिय माळी होते. त्यांच्या घराण्यात फुलांचा व्यवसाय चालू होता त्यावरुन त्यांना पुढे फुले म्हणू लागले. ज्योतीबा फुले एक वर्षाचे असतांना त्यांची आई मृत्यू पावली. गोविंदारावाना आपल्या मुलांना शिक्षण मिळावे असे वाटत होते. त्यामुळेच त्यांनी ज्योतिबाला सातव्या वर्षी खासगी शाळेत घातले. त्यावेळचे वातावरण विद्याभ्यासास पोषक नव्हते. शिक्षणाचे महत्व लोकांना पटलेले नव्हते. इतरांनी गोविंदरावांचा बुध्दीघ्रम केला. परिणामी ज्योतिबांना शाळेतून काढण्यात आले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह धनकवाडीच्या झगडे पाटील यांच्या सावित्रीबाई या कन्येशी झाला. ज्योतिबांची चिंतनशीलता व बौध्दिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी आणि धर्मोपदेशक लिजीट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा चालू करावे असा आग्रह गोविंदरावाकडे धरला. त्यांना त्यांनी मुलाच्या कर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे हे पटवून दिले. गोविंदरांवानाही हे विचार पटले. त्यांनी पुन्हा ज्योतिबास साळेत घालण्याचा निर्णय घेतला. इ.स. १८४१ मध्ये त्यानी एका स्कॉटिश मिशनरी शाळेत जाण्यास सुरुवात केली. तेथे सदाशिव गावंडे या ब्राम्हण मित्राच्या सहवासात त्यांनी शिवाजी व वॉशिंग्टन यांची चरित्रे अभ्यासली, "राईट्स ऑफ मॅन" या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा त्यांच्यावर परिणाम झाला. स्वातंत्र्य व लोककल्याण यांचा विचार करीत असतांना ज्योतिरावांच्या जीवनात एक महत्वाची घटना घडली. ज्योतिराव आपल्या एका ब्राम्हण मित्राच्या लग्नाला गेले असता, वरातीमध्ये ब्राम्हणांनी त्यांचा क्षुद्र म्हणून अपमान केलाव विषमतेबद्दलाल्या केला पाहिजे अस पुढील आयुष्या विशाल ध्येय श अज्ञानरूपी शिक्षणाने मनुष शक्ती प्राप्त होते जागृत होते है = पुढे संपूर्ण कुन पेशवाई होता. पुण्यान परिस्थितीत बुधवार पेठेत कठीण असा नेमले. ही ग नाना प्रकारे सनातनी करो." गो घराबाहेर = काही दिव जुनागंज १८५१ संख्या ८ तिसरी काढली. मत व्य शाळेती अंकातअपमान केला व त्यांना वरातीमागुन यायला सांगितले तेव्हापासून सामाजिक विषमतेबद्दल त्यांच्या मनात चिड निर्माण झाली. सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष । केला पाहिजे असा त्यांनी निर्धार केला. सामाजिक अप्रतिष्ठेचा हा कलंक त्यांच्या पुढील आयुष्याचे उगम स्थान ठरला. पुढे या वैयक्तीक अपमानाचे रूपांतर विशाल ध्येय शक्तीत झाले. अज्ञानरूपी अंध:काराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे शस्त्र नाही शिक्षणाने मनुष्याला सत्य व असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृत होते हे ज्योतिरावांनी ताडले होते, त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे ज्योतिरावांचे मत होते. पेशवाई जाऊन इंग्रजाची राजवट आली तरीही लोकांवर पेशवाईचा प्रभाव होता. पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती. अशा प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी १८४८ मध्ये मुळींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा बुधवार पेठेतील भिडयांच्या वाड्यात भरत असे. त्याकाळात शिक्षक मिळणे कठीण असल्यामुळे, ज्योतिबांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून नेमले. ही गोष्ट त्याकाळी सनातन्यांना पटली नाही. म्हणून त्यांनी सावित्रीबाईचा नाना प्रकारे छळ करणे आरंभीले. परंतु त्या आपल्या कामात मग्न होत्या. सनातनी लोकांना त्या म्हणत, "मी आपले कर्तव्य करीन, देव तुम्हास क्षमा करो." गोविंदरावावर सनातन्यांचा दबाव आल्यामुळे त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर काढले. तसेच दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे काही दिवस शाळा बंद ठेवावी लागली. आर्थिक परिस्थिती सुधारताच त्यांनी जुनागंज पेठेत शाळा उघडली. मेजर कँडी या शाळेला पुस्तके पुरवित. ३ जुलै १८५१ ला ही शाळा चिपळूणकरांच्या वाडयात नेण्यात आली. त्यात मुलीची संख्या ४८ होती. पुढे १७ ऑक्टोंबर १८५१ मध्ये रास्ता पेठेत त्यांनी मुलींची तिसरी शाळा काढली. तर चौथी शाळा १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत काढली. ज्योतिबांच्या शाळांच्या बाबतीत "पुना ऑब्हा्हर" या वृत्तपत्ञाने असे मत व्यक्त केले की, ज्योतिबांच्या शाळेतील मुलांची पटसंख्या सरकारी शाळेतील पटसंख्येपक्षा दहा पटीने मोठी होती. “ज्ञानप्रकाश' या वृत्तपत्राच्या अंकात असे व्यक्त केले की, "सर्व जातींच्या मुलासांठी ज्योतिराव फुले फारमेहनत करुन लिहिणे, वाचणे शिकवत आहेत. या स्तुत्य कामाच्या सन्मानार्थ । सरकारने एक शालजोडी देण्याचा हुकूम केला व ती शालजोडी बोर्डामार्फत कचेरीतून सदरहू गृहस्थास देण्यात येणार आहे." अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत । महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले त्याबद्दल सरकारने इ.स. १८५२ मध्ये विश्रामबाग वाडयात त्यांचा जाहीर सत्कार केला. तिला पुरुषाबरोबर समानतेचा दर्जा नव्हता. स्त्रियांकडे केवळ उपभोग्य वस्तु म्हणूनच पाहिले जा असे. 'चूल व मूल' एवढेच तिचे कार्यक्षत्र मानले जाई. समाजामध्ये बालविवार पध्दती असल्याने बालविवाहांची संख्या खूप होती. या स्त्रिया नैसर्गिक विषय वासनेच्या पोटी अनैतिक मार्गाचा अवलंब करीत. अनौरस संततीच्या भीतीने भ्रूणहत्या केली जाई. केशवपन सारख्या चाली रूढ होत्या. अशा वेळी ज्योतीरावांनी स्त्री उध्दाराचे कार्य हाती घेतले. त्याकाळी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. सन १८६४ मध्ये ज्योतिबा फुलेंनी पुण्यातील गोखले बागेत शणवी जातीत एक पुनर्विवाह घडवून आणला. विधवा स्त्रियांना लैंगिक भावना व अपत्यप्रेम यापासून वंचित राहावे लागे. अशा स्त्रिया काही वेळा पुरुषांच्या वासनेला बळी पडत व नवीन जन्माला येणाऱ्या अर्भकाची हत्या करीत. भ्रुणहत्या थांबावी या उद्देशाने ज्योतिरांवानी १८६४ मध्ये आपल्या राहत्या घरात 'भ्रूणहत्या प्रतिबंधक' (बालहत्या प्रतिबंधक) गृह उघडले. ज्योतिबांनी सुरु केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह हे भारतातील पहिलेच होते. सावेलेस त्यांनी जाहीरातीकरिता जी पत्रके लावली त्या पत्रकातील मजकूर पुढील प्रमाण, "विधवांनो इथे येऊन गुप्तपणे व सुरक्षितपणे बाळंत व्हा, तुम्ही आपले मुल न्यावे किंवा येथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मुलाची काळजी हा अनाथ आश्रम घेईल. याच आश्रमात काशीबाई नावाच्या ब्राम्हण विधवेस मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत ठेवून पुढे त्याला ज्योतिरावांनी दत्तक घेतले. त्यांनी केशवपनाला तसेच बहुपलनीकत्वाला विरोध केला. त्याकाळी अस्पृश्यांवर अनन्वित अत्याचार होत होते. सकाळ संध्याकाळ त्यांना गावात फिरावयाची परवानगी नसे. त्यांच्या गळयात मडके व कमरेला खराटा बांधल्या जाते असे. यावरून उच्चवणीयांमध्ये अस्पृशांबदल असणारी घृणा, रोष प्रकट होतो.ज्योतिबांनी मे १८५२ अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरु केली. ३ मध्ये मित्रांच्या सहाय्याने त्यांनी "महार, मांग इत्यादी लोकांना विद्या शिकविण्या मंडळी" नावाची संस्था स्थापना केली. लहुजी मांग, राजबा महार यासारख्या अस्पृश्य लोकांना हाताशी घेऊन शुद्र समाजात शिक्षणाची गोडी निर्माण केली. १८६८ मध्ये ज्योतिबांनी आपल्या घरा जवळचा पाण्याचा हौद अस्पृशंसाठी खुला केला. त्यांनी अस्पृश्यता निर्मुलनाचा जाहीरनामा प्रसिध्द केला. वडिलांच्या श्राध्दाचे जेवण भाऊबंदाना घालण्याऐवजी ज्योतिरावांनी आंधळया, पांगळयांना घातले. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याकरिता ज्योतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. "सर्व साक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्ती" असे या समाजाचे ब्रिद होते. कनिष्ठ वर्गाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारी ती चळवळ होती. 'सत्यशोधक समाज' ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होय. या समाजाची प्रमुख तत्वे पुढील प्रमाणे. (१) सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत. (२) आईवड़ीलांना प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे मध्यस्थाची गरज नसते त्याच प्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते. (३) प्रत्येकाला ईश्वर भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. (४) व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्मावर अवलंबून नसून गुणावर अवलंबून असते. (५) कोणताही छंद कमी प्रतीचा नाही. (६) ईश्वर निर्वीकार आहे. या समाजाचे प्रतिनिधी होतांना पुढील प्रमाणे प्रतिज्ञा घ्यावी लागेल - "सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत, सर्व माझी भावंडे आहेत अशा बुध्दीने मी त्यांच्याशी वागेन, धार्मिक विधीच्या वेळी मी मध्यस्थ ठेवणार नाही. मी माझ्या मुलांना सुशिक्षित करीन.," या समाजाचा विरोध ब्राम्हणांना नव्हता तर ब्राम्हण्याला होता, या समाजाविषयी धनंजय कीर म्हणतात, "आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनासाठी चळवळ सुरु करणारी 'सत्यशोधक समाज' ही पहिली संस्था आहे." पुण्यात डॉ. गावंडे यांच्या घरी दर आठवड्याला या समाजाची सभा भरत असे. महाराष्ट्रातील शेतकरी अनिष्ठ चालिरिती धर्मभोळेपणा याखाली दबलागेला होता. दारिद्रय, मागासलेला, कर्जबाजारीपणा यात शेतकरी पिचून गेला होता. शेतकरी सुखी तर देश सुखी अशी ज्योतिबांची भावना होती. त्यांनी शेतक-्यांच्या स्थितीचे शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथात प्रभावीपणे वर्णन के शेतकऱ्यांचे दुःख दारिद्रयाचे मूळ त्यांच्या अज्ञानात आहे, हे स्पष्ट करतांनाते म्हणतात, (30 विद्ये विना मती गेली। मतिविना नितीगेली। नितीवीना गती गेली। गती विना वित्त गेले। वित्तविना शुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। १८८६ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचे चिरंजीव ड्युक ऑफ कॅनाट भारतात आल्यानंतर ज्योतिरावांनी शेतकऱ्यांची कैफियत शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन सांगितली. मुंबईतील गिरणी कामगारावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी त्यांनी नारायणराव लोखंडे यांच्या सहाय्याने कामगार संघटना स्थापन केली. इतर कार्य (१) हिन्दुस्थानातील शिक्षणाच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी सरकारने १८८२ साली नेमलेल्या हंटर आंयोगापुढे ज्योतिबांनी आपले शैक्षणिक विचार मांडले. १२ वर्षाच्या आतील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे असे ठणकावून सांगितले. (२) ज्योतिबा जवळ जवळ १० वर्षे पुणे नगरपालिकेचे सभासद होते. (३) सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्यासाठी पाश्चात्य शिक्षणाचा व ज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. (४) भालेकर यांच्या सहाय्याने 'दिनबंधु' हे वृत्तपत्र सुरु करून लोकजागृतीचे कार्य केले. कामगार स्त्रियांना सकाळी ६ पूर्वी व सायंकाळी ६ नंतर कामावर घेऊ नये व विश्रांतीसाठी कामावर सुट्टी मिळावी असा ठराव ज्योतिरावांनी मांडला. महात्मा फुलेंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यांस असे दिसून येईल की समाज सुधारणेसाठी शिक्षण हेच माध्यम आहे असा त्यांनी प्रचार केला. त्याना सुधारणा व अस्पृश्योद्वाराचे कार्य हाती घेतले. फुल्यांचे कार्य सामाजिक दृष्टया महत्वाचे व क्रांतीकारक होते. याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री म्हणतात,"हिन्दू समाजातील बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करायला . लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय." त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना 'महात्मा' ही उपाधी बहाल करण्यात आली. ज्योतीबांनी गुलामगिरी हा ग्रंथ १८७३ साली प्रकाशित केला. धार्मिक सामाजिक व आर्थिक अथवा इतर कोणत्याही गुलामगिरी विरुध्द त्यांच्या मनात तिटकारा होता. अमेरिकेतील गुलामगिरीबद्दल लढणाऱ्या लोकांना त्यांनी हा आर्पण केला. ज्योतिबांनी 'शेतकऱ्याचा आसूड' हा ग्रंथ १८८५ मध्ये लिहिला. या ग्रंथात शेतक-्यांच्या खालावलेल्या स्थितीचे वर्णन केले होते त्यात त्यानी सामाजिक प्रश्नांचा उहापोह केला आहे. त्याच बरोबर त्यांनी इशारा हे पुस्तक लिहिले. त्यात जातीभेदाविषयी विचार मांडले आहेत. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होय. या ग्रंथात त्यांनी धार्मिक, सामाजिक, नैतिक, व्यावहारीक वगैरे विविध विषयांची चर्चा केली आहे. जोतीरावांची साठी उलटल्यावर हळूहळू त्यांच्या जीवनशक्तीची गती मंदावत गेली. त्यांना अर्धागवायूचा झटका आला. उजवे अंग विकलित झाले. तशातही त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला. त्यांची इच्छाशक्ती मात्र दांडगी होती, जिद्द होती. त्यांच्या दत्तकपुत्राचे - यशवंताचे लग्न झाले. हडपसरच्या ससाण्यांची गुणी मुलगी राधा ही त्यांना चांगली सून लाभली. तिने सासऱ्यांची सेवा मनोभावे केली. तिचे सासरचं नाव चंद्रभागा होते. २७ नोव्हेंबर १८९० बुधवार रोजी दुपार पासून जोतीरावांची प्रकृती खूपच बिघडली. औषधोपचारांनी थोडे बरे वाटल्यावर त्यांनी आपल्या सर्व लोकांना जवळ बोलावले आणि शेवटचे चार शब्द सांगून आपले सर्व कार्य पुढे चालविण्यास सांगितलं. रात्रीचे बारा वाजून गेले. दोन वाजले आणि जोतीरावांनी आपले दोन्ही डोळे कायमचे झाकले. त्यांची जीवन ज्योत मावळून गेली. आणि मग सर्वत्र आर्कांत उडाला. पुणे हळहळले, मुंबई हळहळली. दुसरे दिवशी अंत्यदर्शनाला लोकांची गर्दी उसळली. अंत्ययात्रा निघाली. सर्वानी मग जोतीरावांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली 

महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले Reviewed by D beldar on ऑक्टोबर २९, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.