Ads

वीर माता जिजाबाई ची शिवरायांस शिकवण


 जिजाबाई ही काही सामान्य स्त्रीनव्हती. ती लखुजीराव जाधव सारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारण वं युद्धनीतीचे जिजाबाईंना बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला, तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही, याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशाहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता, की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वत:च आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या.


मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी-कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे, असे शिवरायांना वाटे.


घरी आल्यावर शिवराय जिजाबाई पाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, "शिवबा, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण. त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तूसुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तूसुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील.आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीरपुरुष शिवरायांना सतत ध्यानी, मनी, स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले, तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला, तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी 6. णे व्हावे, असे शिवरायांना सतत वाटू लागले.

वीर माता जिजाबाई ची शिवरायांस शिकवण  वीर माता जिजाबाई ची शिवरायांस शिकवण Reviewed by D beldar on ऑक्टोबर १३, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.