Ads

स्वातंत्र्यवीर सावरकर


 स्वातंत्र्यवीर सावरकर 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमकळा' या अजरामर गीतातून मायभूमीचे उत्कट प्रेम दर्शविणाऱ्या सावरकरांची आज आठवण होते. नुसत्या काळया पाण्याचं नाव काढलं तरी अंगावर शहारे उभे राहायचे. त्या काळात सावरकर ती शिक्षा भोगून आपल्या मायदेशी परतले आणि त्यावेळीच त्यांच्या मुखातून उपरोक्त ओळी बाहेर पडल्या. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले. अहिंसेने देश स्वतंत्र होणार नाही याची जाणीव होती, म्हणूनच स्वातंत्र्यासाठी त्यांनी समराचा मार्ग पत्करला. पर निदोषाची हत्या कधीच केली नाही. आपल्या गालावर कोणी एक थापड मार तर हिंसा नको म्हणून त्यांनी दुसरा गाल पुढे केला नाही. उलट त्या थापड उत्तरही त्यांनी तितक्याच प्रखरतेने दिले. हिंदू म्हणजे दीन नव्हेत त्यांच्यात प्रतिकाराची ताकद आहेच आणि जेव्हा एक लाख हिंदुस्थानी एकत्र येतात ते शे दोनशे गोऱ्यांचा काय निभाव लागणार? त्यांना आपले बस्तान हलवा लागेल असे धगधगते विचार होते. विनायक दामोदर सावरकर त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म २८ मे १८- ला नाशिकच्या भगूर गावात झाला. विनायकराव धरुन ते चार भावंडे. गप म्हणजे बाबाराव, बहीण मैनाबाई आणि नारायण. वडीलांनी त्यांना नाशिक शिवाजी शाळेत शिकायला पाठवले. विनायक ९ वर्षाचा असताना त्या आईचे कॉलऱ्यामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दामोदर पंतांनी मुल सांभाळ केला, १८९९ ला दामोदर पंताचे निधन झाले. विनायकरावांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटत होते. त्यासाठी त मित्रमेळा नावाची संस्था काढली. या संस्थेत त्यांच्या सारखेच अनेक देश त्यांनी समाविष्ट केले. पारतंत्र्यात राहणे त्यांना पसंत नव्हते.साऱ्याच सदस्यांना नेहमीच संपूर्ण स्वराज्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वराज्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी होती. व्यायामामुळे शरीर बळकट होते म्हणून त्यांनी ती कणरखरता अंगीकारली. CO पार्च १९०१ ला विनायकाचे लग्न झाले, रामचंद्र चिपळूणकरांची कर यमुनाबाई हिच्याशी. त्यावेळी यमुनाबाईनी सावरकरांच्या शिक्षणासाठी खूप हातभार लावला. मट्रिक झाल्यानंतर सावरकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज प्रवेश घेतला. त्यावेळी कॉलेजातल्या काही मुलांना सोबत घेऊन सावरकरांनी स्वदेशी वस्तू वापरा असा संदेश दिला. 'स्वदेशी वस्तू वापरा देश वाचवा' अशा उद्देशाने त्यांनी त्यावेळीच चळवळ सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी मित्रमेळाचे नामांतरण अभिनव भारत असे केले. लंडनमध्ये सावरकर 'इंडिया हाऊस' मध्ये राहायला होते. पंडित श्यामजी यानी या संस्थेची स्थापना केली होती, याच ठिकाणी सावरकरांनी भारत मुक्ती समितीची स्थापना केली आणि दर आठवड्याला त्यांची बैठक होत असे. यावेळी ते स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेत्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करु लागले. भारतीय स्वातंत्र्य युध्दाचा इतिहास' हे पुस्तक सावरकरांनी १९०८ मध्ये पूर्ण केले. परंतु ते पुस्तक क्रांती भडकविणारे असल्याचा आरोप करुन ब्रिटिशांनी त्याच्या प्रकाशनावर बंदी घातली. परंतु तरीही फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ते प्रकाशित करण्यात आले. भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांनी या पुस्तकातून प्रेरणा घेऊन भारताचा स्वातंत्र्य लढा आणखी तीव्र केला. सावरकरांचे अनुयायी मदनलाल धिग्रा याने १९०९ मध्ये भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराचा सूड म्हणून सर विली याला ठार मारले. त्यांच्या खुनाच्या आरोपावरुन धिंग्राला अटक करण्यात आली. लंडनमध्ये धिंग्रा याच्या कृत्याचा निषेध म्हणून एक बैठक बोलावण्यात आली, परंतु सावरकरानी मात्र याला विरोध केला. त्याबद्दलचे त्यांचे विचार त्यांनी 'लंडन टाईम्स' या वृत्त पत्राला कळविले. सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी भारतात मिन्टो मोलें सुधारणाविरुध्द एक सशस्त्र चळवळ सुरु केली. या घटनेच्या विरोधात बाबाराव यांना अंदमानच्या तुरुंगात पाठविण्यात आले. याचा निषेध म्हणून मन्हेरे नावाच्या क्रांतिकारकाने जॅक्शन या ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याचा नाशिकयेथे खून केला. सावरकरांना त्यांच्या इंडिया हाऊसशी असलेल्या संविधान वरून या खूनासाठी जबाबदार धरण्यात आले. सावरकर पॅरिसच्या मॅडम कामा यांच्याकडे राहायला गेले ब्रिटिश सरकारने सावरकरां विरुध्द अटक वॉरट जारी करून १३ मार्च १९१० ला त्यांना अटक केली. या काळात एका मित्राला पत्र लिहून त्यांनी आपल्या सुटकेची योजना बनवली, परंतु गाडी टशिर पोहचल्यामुळे योजना बारगळली. सावरकरांना यानंतर एस.एस. मोरिया या जहाजाने मुंबईला आणले आणि बेरवडयाच्या तुरुंगात टाकण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर खटला चालवू एका आरोपाखाली २५ वर्षे आणि दुसऱ्या आरोपाखाली २५ वर्षे अशी एकू ५० वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. यावेळी त्यांचे व केवळ २७ वर्षाचे होते. सावरकर ४ जुलै १९११ ला अंदमानच्या तुरुंगा दाखल झाले. या कारागृहात कैद्यांना अतिशय अमानुष वागणूक देण्यात ये होती. सकाळी ५ वाजता सावरकरांच्या दिवसाला सुरुवात होई. त्यानंत लाकडे फोडणे आणि त्यानंतर त्यांना बैलाऐबजी तेलधाण्याला जुंपले जा यावेळी एखाद्या कैद्याने जर दुसऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा र तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबर शिक्षा होई. सावरकरांनी कारागृह वाचनालय सुरु व्हावे म्हणून तुरुंगाधिकाऱ्याकडून परवानगी मागितली. स्वत: कैद्यांना लिहायला आणि वाचायला शिकवित. वल्लभभाई पटेल यां १९२० मध्ये सावरकरांच्या सुटकेची मागणी केंद्रीय विधानसभेत के टिळक आणि गांधी यांनीही त्याला सहमती दर्शविली. २ मे १९२१ ला त्यांना एस.एस. महाराजा या जहाजाने भारतात य आणले आणि त्यांना रत्नागिरीच्या आणि नंतर येरवडयाच्या तुरुंग धाडण्यात आले आणि ६ जानेवारी १९२४ ला त्यांची सुटका करण्य आली. पण एका अटीवर, ते म्हणजे, रत्नागिरी न सोडण्याची आणि पुढ पाच वर्षासाठी कुठल्याही राजकीय चळवळीत भाग न घेण्याची. रत्नागिरी तुरुंगात त्यांनी हिंदुत्व नावाचे पुस्तक लिहिले तेही 'महाठा' या टो नावाने. सुंटका झाल्यानंतर २३ जानेवारी १९२४ ला त्यांनी हिंदू महास स्थापना केली. भारताव्या पुरातन संस्कृतीचे रक्षण करणे आणि समाज कल्याणासाठी काम करणे हा त्यांच्या संस्थेचा उद्देश होता.                    हिंदू सणवारांच्या निमित्ताने मुस्लीम आणि ख्रिश्चन घरांना भेटी देत. याव्दारे ते समाजात बंधुभाव निर्माण करीत. अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी डॉ.. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले. यानंतर सावरकरांनी हिंदू महासभा या स्वत्र पक्षाची स्थापना केली. मुस्लीम लिगने चालविलेल्या भारताच्या फाळणी संदर्भात त्यांनी मुस्लीम लीता इशारा दिला. भारत स्वतंत्र झाल्यावर ४ फेब्रुवारी १९४८ ला गांधीजीच्या हत्येसंदर्भात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. नथुराम घोडसे आणि आपटे या दोघांनी गांधीजीच्या हत्येशी सावरकरांचा तिळमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट पणे सांगितले. त्यानंतर १० फेब्रुवारी १९५० रोजी सावरकरांची सुटका झाली. सावरकरांनी वर्तविलेले भाकित त्यांच्या अखेरच्या दिवसात खरे ठरले. १९६२ ला चीनने आणि १९६५ ला पाकिस्तान ने भारतावर आक्रमण केले. १९६५ मध्ये भारतीय फौजा जेव्हा लाहोर मध्ये धडकल्या तेव्हा सावरकर म्हणाले, 'युध्द जिंकण्याचा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग म्हणजे शत्रूच्या भूमीवर लढणे होय.' असा थोर देशभक्त भारतमातेचा सुपुत्र 'वीर' सावरकर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी भारतमातेला पोरकी करुन निधून गेला. स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम करणाऱ्या देशभक्तांत सावरकरांची गणना होते. त्यांच्या निधनाने सिंहाच्या काळजाचा एक महान क्रांतीकारक कालवश झाला. चतुरस्त्र लेखकाची लेखणी थांबली आणि एका महान सूर्याचा अस्त झाला. अशा या महासूर्याला शतशः प्रणाम!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर Reviewed by D beldar on ऑक्टोबर २९, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.