Ads

जवाहरलाल नेहरू विकिपीडिया

 


         जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे एका सुसंस्कृत व सधन कुटुबांत झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातील एक ख्यातनाम वकील होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही महत्वाची भूमिका बजावली होती. अशा प्रकारे जवाहरलाल नेहरू यांच्यावर राजकारणाचे व सार्वजनिक कार्याचे संस्कार घरातूनच झाले होते. त्यांच्या दृष्टीने तो एक


प्रकारचा कौटुंबिक वारसा होता. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरी अलाहाबाद येथे झाले. पुढे ते शिक्षणसाठी इंग्लंडला गेले. तेथे हॅरो येथील पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात दाखल झाले. सन् १९१२ मध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले.


भारतात परतल्यावर नेहरूंनी अलाहाबाद येथे वकिली सुरु कैली परंतु लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काही काळ त्यांनी 'होमरूल लीग' या संघटनेचे कार्य केले. पुढे ते महात्मा गांधीजीच्या सहवासात आले. गांधीजीच्या व्यक्तिमत्वाने ते अत्यंत प्रभावित झाले आणि गांधीजीचे परम भक्त व लाडके शिष्य बनले. अर्थात, गांधीवादातील काही तत्वावर नेहरूंचा विश्वास असला तरी ते खऱ्या अर्थाने गांधीवादी मात्र कधीच झाले नाहीत.


सन् १९२० नंतरच्या काळातील भारतीय राजकारणावर व स्वातंत्र्य आंदोलनावर महात्मा गांधीचा सर्वाधिक प्रभाव असला तरी पंडित नेहरूंनी. या काळात स्व:तचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस हे भारतीय युवक वर्गाच्या इच्छा-आकाक्षांचे प्रतीकच बनले होते. भारताच्या स्वातंत्र्य-आंदोलनात या दोघानीही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याबदल त्यांनी अनेक वेळा कारावासही भोगला होता. सन् १९२० मध्ये नेहरूंनी सोव्हियत युनियनला भेट दिली. समाजवादाच्या प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि समाजवादी विचारांकडे आकर्षित झाले. डिसेंबर, १९२९ मध्ये लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय । काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेहरूंची निवड झाली होती. याच अधिवेशनात ३१ डिसेंबर, १९२९ रोजी काँग्रेसने प्रथमच समाजवादा वरील आपला विश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची चार वेळा निवड झाली होती.


ऑगस्ट १९४२ च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात 'चले जाव' ना ठराव संमत होण्यात नेहरूंचा प्रमुख वाटा होता. त्यानंतर लगेचच इंग्रज सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले. जवाहरलालजी आता राजकारणात समरस झाले. भारत-मातेची पारतंत्र्यातून मुक्ता करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. ते एकटे काहीच करु शकत नसले, तरी त्या सिद्धतेसाठी अनेक तरुण पुढे आले होते, मारू किंवा मरू हीच त्यांची प्रतिज्ञा होती. जवाहरलालजी चे वडील मोतीलाल उतारवया मुळे आजारी पडले होते.


डॉक्टरी उपचार योग्य प्रकारे चालू होते पण ते निरुपयोगी ठरत होते, तरीही त्यांचे मन खंबीर होते. स्वातंत्र्याचे विचार सुटले नव्हते. "भारत स्वतंत्र होऊन स्वातंत्र्य मिळाल्याचे भाग्य पाहण्याचा योग माझ्या नशिबी नाही, पण खात्री आहे, की तुम्ही व तुमचे सर्व सहकारी ते मिळविल्या शिवाय राहणार नाही. परमेश्वर ती प्रेरणा तुम्हाला निश्चित देईल.” शेवटी सन् १९३१ मध्ये त्यांची इहलोकाची यात्रा संपली. ते चिरशांतीत विलीन झाले. हा दुःखद आघात पं. जवाहरलाल यांना सोसावा लागला. तेही मनाचे मोठे खंबीर. पितृशोक हा खूप अस्वस्थ करणारा असला, तरी त्यांनी आपले मन आवरले व पुढ़चे कार्य


सुरू केले! जवाहरलालजी हे इंग्रज सरकारच्या दृष्टी पुढचे एक विरोधी सावज म्हणून वावरत होते. कुठे सत्याग्रह केल्याबद्दल, कुठे विरोधी लेख लिहिल्याबद्दल, कुठे सरकार विरुद्ध भाषण करून जनतेमध्ये प्रक्षोभ उठविल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना तुरुंगात वाट दाखवून अडवून ठेवण्याची त्यांची सतत तयारी असे.

जवाहरलाल नेहरू विकिपीडिया जवाहरलाल नेहरू विकिपीडिया Reviewed by D beldar on ऑक्टोबर ०९, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.