Ads

बाबासाहेब आंबेडकर विकिपीडिया part 2

 



नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. तसेच पुढील दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेचे (१९३०-३२) साली प्रतिनिधीत्वही त्यांनीच केले. यामध्ये आंबेडकरांनी राखीव जागांची मागणी केली. यामध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचीही मागणी केले होती. अस्पृश्यांना हिंदूपासून अलग करणाऱ्या जातीय निवाडा विरुध्द महात्मा


गांधीनी पूणे येथे येरवडा तुरुंगातच प्राणांतिक उपोषण सुरु केले. तेव्हा तडजोड म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात असे ठरले. त्यानुसार अशा १४८ राखीव जागांसाठी डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ ला करार झाला. यालाच पुणे करार अथवा येरवडा करार असे म्हणतात, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकर नेहरु मंत्रीमंडळात कायदा मंत्री झाले. घटना समीतीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष  


होते. १९४९ मध्ये त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. हिंदू कोड बिलाची निर्मिती ही त्यांना केली. पुढे याच बिलाच्या वादावरुन संसदेत श्रेष्ठींशी मतभेद होऊन त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भारताची राज्यघटना २ वर्षे १.१ महिने १८ दिवसात तयार केली. म्हणून त्यांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी १३ ऑक्टोंबर १९३५ रोजी नाशिक जिल्हयातील येवला' येथे बोलतांना धर्मांतराची जाहीर घोषणा केली. त्यामुळे देशप्त वादळ उठले. येवला येथील भाषणात त्यांनी घोषणा केली की, 'मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलों तरी हिंदू म्हणून मरणार नाही. परंतु प्रत्यक्षात धर्मातराचा निर्णय १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी त्यांनी अमलात आणला नागपूर येथे त्यांच्या सोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी 'बौध्द धर्मात प्रवेश केला. बौद्ध धर्माची दिक्षा त्यांनी चंद्रमणी महास्थिर' यांच्याकडून घेतली.


बाबासाहेब विद्येचे भोक्ते होते. अखंड वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांच्या स्वत:च्या ग्रंथालयातील ग्रंथ संख्या जवळ जवळ २५ हजार होती. १९४२ साली त्यांनी 'शेड्युल कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली, तर १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडियाची' स्थापना केली.


डॉ. आंबेडकरानी अनेक ग्रंथ लिहिले. ज्यामुळे समाज परिवर्तनास मदत झाली. अनेक वर्षाच्या राजकीय, सामाजिक, कामांच्या न संपणाऱ्या दगदगीने आंबेडकरांची प्रकृती फारच खराब झाली होती. मधुमेहाचा त्रास त्यांना फार वर्षापासून होताच. राज्यघटना तयार करण्याचे काम चालू असतानाच ते फार आजारी झाले. त्यांना मुंबईला रुग्णालयात ठेवले होते. तेथे डॉ. शारदा कबीर त्यांच्यावर औषधोपचार करीत होत्या. आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई १९३४ साली मरण पावल्या. त्यातर आपले आयुष्य एकट्यानेच ओढत होते. आता या उतार वयात व बऱ्या न होणाऱ्या आजारपणात त्यांना सोबतीची आधाराची गरज भासू लागली. डॉ. शारदा कबीरही आंबेडकरांच्या उच्च आचार विचारांनी त्यांच्या भक्त बनल्या होत्या. दोघांनी विवाह करण्याचे ठरविले व मुंबईला अत्यंत साधेपणाने हा विवाह साजरा झाला. त्यांच्या नवीन पत्नीने


पुठल्या सात-आठ वर्षात आंबेडकरांची फार ममतेने सेवा केली. परंतु आता दिव्यातील तेल संपत आले होते. दि. ४ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकर राज्यसभेत जाऊन आले. पाच तारखेला जैन लोकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी काही चर्चा केली. प्रकृती नादुरुस्त होतीच तरी नित्याप्रमाणे आंबेडकरांची कामे चालूच होती. हिंदी संतकवी कबीर त्यांचा फार आवडता आणि श्रध्देचा विषय होता. त्यांची अनेक पदे ते नेहमी गुणगुणत असत. त्यादिवशी असेच ते यांचे 'चलो कबीर, तेरा भवसागर डेरा है पद

[08/10, 12:46 PM] Nikhil Hingane: स्वतःशीच सारखे म्हणत होते. हे कशाचे सूचक म्हणायचे? रात्री ते नेहमीसारखेच जाऊन झोपले आणि झोपेतच त्यांचे पहाटे निधन झाले. ती तारीख होती ६ डिसेंबर १९५६. त्यांच्या निधनाने सारा देश हादरला. दालितांना तर आपले मायेचे छत्र हरपले, असे वाटले. त्यांच्या शोकासर पारावर राहिला नाही. आंबेडकरांचा पार्थिव देह मुंबईला आणण्यात आला. दादरच्या चौपाटीवर (चैत्यभूमी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अखंड जळणारी ज्वाला चितेच्या ज्वालामध्ये मिसळून गेली. अत्यंत खडतर परिस्थितीतून आंबेडकरांनी स्वत:चा जीवनमार्ग शोधला. आणि स्वतः बरोबरच साऱ्या दलित वर्गालाही त्या मार्गावरुन चालण्याची प्रेरणा दिली. जीवनात पावला पावलाला अनेकांशी झगडा करावा लागल्याने भांडखोर, हदवादी, तुसडे आहेत, असे लोकांना वाटे. पण त्यांचा राग हा त्या त्या प्रसंगापुरता असे. एरव्ही ते शांत, संयमी, निगर्वी, प्रसिध्दी विन्मुख आणि अतिशय सुसंस्कृत असे महामानव होते. त्यांच्या सारखा ज्ञानोपासक शतकातून एखादाच होत असतो. त्यांचा स्वत:च ग्रंथसंग्रह अक्षरशः प्रचंड म्हणावा असा होता. मृत्यूपूर्वी त्यांनी तो मुंबईत स्वतः स्थापन केलेल्या सिध्दार्थ महाविद्यालयाला देऊन टाकला.


शेवटी आता एकाच गोष्टीचा विचार करावयाचा की, आंबेडकरांनी भारताला कोणती देणगी दिली? मला वाटते त्यांनी एक अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली. अतिशय उदार आणि प्रगतशील असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला, आणि हजारो वर्षे अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला. यामुळे सर्व भारतीय आधुनिक मनू म्हणून त्यांचा अतीव आदराने नेहमीच सन्मान करतील! बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्म शताब्दीच्या महोत्सवाच्या प्रारंभाचा योग म्हणजे १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान करण्यात आला.

बाबासाहेब आंबेडकर विकिपीडिया part 2 बाबासाहेब आंबेडकर विकिपीडिया part 2 Reviewed by D beldar on ऑक्टोबर ०८, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.