Ads

बाबासाहेब आंबेडकर विकिपीडिया

 



      अस्पृश्य समाजातील अस्मीता जागविणारा पहिला महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कार्टून पंडित, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्वान अशा अनेक बिरुदावली लाभलेल्या या युगप्रवर्तकाचा जन्म मध्यप्रदेशातील महू यागावी १४ एप्रिल १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मुळ गाव, त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्यात सुभेदार मेजर या पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले. ते आंबवडे चे असल्यामुळे त्यांना


आंबेडकर असे म्हणू लागले. त्यांचे पूर्ण नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर. भीमराव इ.स. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन' कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. इ.स. १९१२ ला पदवी (बी.ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व अमेरिकेतील 'कोलंबिया विद्यापिठात त्यांना प्रवेश मिळाला. त्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांचे साहाय्य लाभले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. इ.स. १९१५ मध्ये त्यांनी '्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळविली व a National Dividend of India a historical and analytical study' प्रबंधा बद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी. ही पदवी बहाल केली.

[08/10, 12:42 PM] Nikhil Hingane: अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून आंबेडकर भारतात परत आले व बडोदा संस्थानात नोकरी केली. त्यानंतर आंबेडकर, कायदा व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले, परंतु आर्थिक अडचणी मुळे ते परत भारतात आले. काही काळ त्यांनी मुंबईच्या 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली.


मुंबईमध्येच आंबेडकरांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. ३१ जानेवारी १९२० मध्ये त्यांनी 'मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. माणगांव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी भाग घेतला. परंतु शिक्षणाच्या लालसेने १९२० मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीवर ते पुन्हा इंग्लंडला गेले व तेथे त्यांनी लंडन विद्यापीठातून बी.एस.सी. केली व Theproblemofrupee' या प्रबंधाबद्दल त्यांना डी.एस.सी. ही पदवी मिळाली. त्यानंतर लवकरच ते बॅरिस्टरच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. १९२३


मध्ये परत् भारतात आल्यावर त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरु केली. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी इ.स. १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. तसेच 'बहिष्कृत भारत' हे साप्ताहिक सुरु केले. तसेच या सभे तर्फे दलित समाजातील तरुण व प्रौंढासाठी रात्रशाळा चालविणे, वाचनालये सुरु करणे, यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले. इ.स. १९४६ मध्ये त्यांनी 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली तिच्या वतीने मुंबईला 'सिद्धार्थ कॉलेज' व औरंगाबादला 'मिलींद महाविद्यालय' सुरु केले. तसेच


दलित विद्यार्थ्या साठी अनेक वस्तीगृहे सुरु केली. हिंदू समाजातील जातीभेद नष्ट व्हावा, समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी इ.स. १९२७ साली 'समाज समता संघ स्थापना केला. या संघा तर्फे समता' हे आणखी एक वृत्तपत्र सुरु केले. इ.स. १९२७ मध्ये बाबासाहेबांची मुंबई विधीमंडळावर निवड झाली. महाड या गावी चवदार तळयाचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव


होता. तेथील नगरपालिकेने ठराव करुन हे तळे अस्पृश्यांसाठी सुरु केले होते.


परंतु सवर्ण हिंदूच्या भीतीने हे अस्पृश्य बांधव तेथे जाऊ शकत नव्हते. तेव्हा


आंबेडकरानी २० मार्च १९२७ रोजी सत्याग्रह कर अस्पृश्यांचाही हक्क आहे, याची सर्वाना जाणीव करुन दिली. सामाजिक भेदभाव आणि उच्च निच्च भेदभाव याचे समर्थन करणारा ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले.


हिंदू धर्मातील उच्च वर्णियांनी अस्पृश्यांना नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश नाकारला होता. या विरुध्द डॉ. आंबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी मंदिरासमोर सत्याग्रह केला. त्याबाबतीत आंबेडकर म्हणतात की 'हिंदुत्व ही जितकी स्पृशांची मालमत्ता आहे, तितकीच ती अस्पृश्यांची आहे. म्हणून मंदिर प्रवेशाचा हक्क मान्य झालाच पाहिजे.' १९३५ पर्यंत हा सत्याग्रह सुरु होता. अशाच प्रकारे अचलपुर येथील दत्त मंदिर, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अमरावतीचे अंबामाता मंदिर सर्वाना खुले करण्यात आले. यामागे आंबेडकरांची प्रेरणा होती.

बाबासाहेब आंबेडकर विकिपीडिया  बाबासाहेब आंबेडकर विकिपीडिया Reviewed by D beldar on ऑक्टोबर ०८, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Ads

Blogger द्वारे प्रायोजित.